Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नॅशनल टेस्टींग एजन्सीनं ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल टेस्टींग एजन्सी, अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं विविध परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली आहे. कोविड -१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. नॅशनल हॉटेल मॅनेजमेंट कौन्सिलच्या जेईई -२०२०, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी आणि एमबीए प्रवेश परीक्षा, भारतीय कृषी संशोधन परिषद तसंच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांचे अर्ज भरण्याची तारीख पंधरा मे पर्यंत वाढवली आहे.

अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षेची अंतिम तारीखदेखील पाच जूनपर्यंत वाढवली आहे. १५ मे नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची प्रवेशपत्रं डाउनलोड करण्यासाठी सुधारित तपशीलवार वेळापत्रक संबंधित परीक्षा वेबसाइट आणि एनटीए वेबसाइट www.nta.ac.in वर उपलब्ध करुन दिलं जाईल, असं या बातमीत म्हटलं आहे.

Exit mobile version