देशभरातले 130 जिल्हे रेड झोनमधे,महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांचा समावेश
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपत आलेला असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जिल्ह्यांची कोविड 19 च्या प्रादुर्भावावर आधारित 3 प्रकारात विभागणी जाहीर केली आहे.
त्यानुसार देशभरातले 130 जिल्हे रेड झोनमधे असून त्यात महाराष्ट्रातले 14 जिल्हे येतात. कमी प्रादुर्भावाच्या ऑरेंज झोनमधे देशातले 284 जिल्हे आहेत, त्यात राज्यातल्या 16 जिल्ह्यांचा समावेश आहे. ग्रीन झोनमधे एकूण 319 जिल्हे आहेत, त्यापैकी 6 राज्यातले आहेत.