नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेचं परिचालन व्यवस्थित व्हावं यासाठी टाळेबंदीच्या काळात रेल्वेच्या पुलांचं, आणि अन्य डागडुजीचं काम रेल्वे प्रशासनानं हाती घेतलं आहे.
सर्व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्याबरोबरंच प्रलंबीत डागडुजी आणि अन्य प्रकल्प पुर्ण करण्याकडे प्रशासनाचं लक्ष आहे, असं रेल्वेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.
सिग्नल यंत्रणा, ओवर हेड तारांची दुरुस्ती इत्य़ादी कामं यादरम्यान केली जाणार आहेत. १२ हजार किलोमिटरच्या मार्गाच्या दुरुस्तीचा यात समावेश आहे.