Site icon साप्ताहिक एकच ध्येय

4 मे 2020 पासून सुरु होणाऱ्या दोन आठवड्यांच्या लॉकडाऊन दरम्यान ऑरेंज झोनमधील व्यक्ती आणि वाहनांच्या हालचालींबद्दल स्पष्टीकरण

नवी दिल्ली : देशातील कोविड -19 ची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन उपायांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर 4 मे 2020 पासून लॉकडाऊनला आणखी दोन आठवड्यांसाठी मुदतवाढ देण्याचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने काल दिला.

ऑरेंज झोनमधील व्यक्ती आणि वाहनांच्या हालचालींबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी (कृपया https://pib.gov.in/ PressReleasePage.aspx?PRID=1620095) मध्ये दिलेल्या ऑरेंज झोनमधील परवानगी असलेल्या कृतींचा संबंधित परिच्छेद पहा) स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे:

देशभरात प्रतिबंध असलेल्या क्रियांच्या व्यतिरिक्त, ऑरेंज झोनमध्ये, जिल्ह्यात आणि आंतर-जिल्ह्यात  बसगाड्या चालवण्यास प्रतिबंध आहे.

इतर दोन क्रियांना निर्बंधासह परवानगी दिली गेली आहे:

फक्त एक ड्रायव्हर आणि दोन प्रवासी या तत्वावर टॅक्सी आणि कॅब चालकांना परवानगी आहे,

व्यक्ती आणि वाहनांच्या आंतर-जिल्हा वाहतुकीमध्ये  केवळ परवानगी असलेल्या क्रियेसाठी चार चाकी वाहनांमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त जास्तीत जास्त दोन प्रवासी, प्रवास करू शकतात.

ऑरेंज झोनमध्ये इतर सर्व क्रियांना कोणत्याही निर्बंधांशिवाय परवानगी आहे.

तथापि, राज्ये / केंद्रशासित प्रदेश त्यांचे मूल्यांकन आणि प्राधान्य यावर आधारित निर्णय घेऊन याहूनही कमी कामांनाच फक्त  परवानगी देऊ शकतात.

Exit mobile version