नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या १७ मे पर्यंत विशेष श्रमीक रेल्वेगाड्या वगळता इतर सर्व प्रवासी गाड्या रद्दच राहणार असल्याची घोषणा भारतीय रेल्वेनं केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या देशव्यापी संचारबंदीला १७ तारखेपर्यंत मुदतवाढ दिली असल्यानं रेल्वेनं हा निर्णय घेतला.
या काळात फक्त, विविध राज्यांमध्ये अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तसंच भाविकांना त्यांच्या मूळ ठिकाणी जाण्यासाठी सुरु केलेल्या विशेष श्रमीक गाड्याच सुरु राहतील, असं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. यासाठी संबंधित राज्य सरकार अशा प्रवाशांची नोंदणी करून त्यांना रेल्वे स्थानकांपर्यंत पोचवण्याची व्यवस्था करत असल्याची माहितीही रेल्वेनं दिली आहे.