Site icon साप्ताहिक एकच ध्येय

स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागपूर-अमरावती महामार्गाच्या कारंजा इथल्या कोहली पेट्रोल पंपाजवळ स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणारी बस आज सकाळी पलटली. बसमध्ये ५० मजूर होते.  ही बस सूरत इथून ओदिशाला जात होती.

या दुर्घटनेत तीन मजूर जखमी झाले आहेत. या मजुरांना उपचारासाठी कारंजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, बस चालक, क्लिनर आणि इतर प्रवासी जखमींना वाटेतच सोडून दुसऱ्या वाहनाने पसार झाले.

केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना इतर राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरीत मजूर, विद्यार्थ्यांना आपापल्या राज्यात  जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे गुजरातच्या सूरत शहराहून ओदिशाला जाणारी बस रवाना झाली.

Exit mobile version