Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक – सहकार मंत्री सुभाष देशमुख

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये १५४ ब या स्वतंत्र प्रकरणाचा समावेश

मुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावे, यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये १५४- बी या स्वतंत्र प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे विधेयक सन 2019 च्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

श्री.देशमुख म्हणाले, राज्यात एक लाखापेक्षा अधिक सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. नागरी  भागातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गृहनिर्माण संस्थांशी संबंधित आहेत. त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील सर्वसाधारण संस्थांना लागू असलेल्या तरतूदी या सहकारी गृहनिर्माण संस्थांना देखील लागू असल्याने या संस्थांचे प्रश्न निकाली निघण्यास अडचणी निर्माण होत होत्या आणि तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत होत्या अशा तक्रारींचे निवारण लवकर व्हावे, तसेच त्याच्या कामकाजात अधिक सुलभता यावी यासाठी या प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे.

ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणुकीला पात्र होतात, अशा सहकारी संस्था त्यांची निवडणूक घेण्यासाठी संबधित निबंधकाकडे निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्याची मागणी करतात. सदर मागणीच्या अनुषंगाने सबंधित निबंधक सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्तीच्या  मागणीचा अहवाल सादर करतात.   निवडणुकीसाठी तयार केलेल्या नामतालिकेमधून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची निवड करुन संबधित सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत  सबंधित निबंधकांना कळविण्यात येते. त्यानुसार निवडणुका घेण्यात येतात. या सर्व पत्रव्यवहारात निवडणूक घेण्यासाठी बऱ्याच  मोठा कालावधीचा लागतो. परिणामी  सहकारी गृहनिर्माण संस्थावर कार्यरत असलेली समिती पाच वर्षाच्या कालावधीनंतर देखील कायम राहाण्याची परिस्थिती निर्माण होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी २५० सदस्य संख्या  असलेल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांना समितीची निवडणूक घेण्याचे अधिकार संबंधित संस्थेला देण्यात आले आहेत. याबाबतची विहित पद्धत निश्चित करुन त्याबाबत स्वतंत्रपणे निवडणूक नियमात सुधारणा करण्यात येणार आहे.

याशिवाय, विधेयकात प्रामुख्याने पुढीलप्रमाणे तरतुदी करण्यात आल्या आहेत :-

सहयोगी व तात्पुरत्या सदस्यास मतदानाचा हक्क.

या  सर्व तरतुदींमुळे राज्यातील गृहनिर्माण सहकार संस्थांमधील सदस्यांना विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत व त्यांच्या अधिकाराबाबत अधिक स्पष्टता आली आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांचे  कामकाज अधिक सुलभ होणार आहे, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

Exit mobile version