Site icon साप्ताहिक एकच ध्येय

यूएसने एच -1 बी व्हिसाधारक आणि ग्रीन कार्ड अर्जदारांसाठी कागदपत्रे सादर करण्याचा कालावधी 60 दिवसांनी वाढविला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकन सरकारने एच -1 बी व्हिसाधारक आणि ग्रीन कार्ड अर्जदारांसाठी कागदपत्रे सादर करण्याचा कालावधी 60 दिवसांपर्यंत वाढविला आहे. अमेरिकेत कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भारतासह इतर काही देशांतील व्यावसायिक आणि स्थलांतरितांना दिलासा मिळणार आहे.

अमेरिकन नागरिकत्व आणि कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणाऱ्या नागरिकांना सेवा विभाग यांच्याकडून नमूद केलेल्या फॉर्म I-290 B हा वाढीव कालावधीसाठी सबमिट करण्यास परवानगी दिली आहे. हा विभाग दरवर्षी जास्तीत जास्त 65 हजार अति कुशल परदेशी कामगारांना वर्क व्हिसा देतो. हा विभाग अमेरिकन शैक्षणिक संस्थेकडील मास्टर किंवा उच्च पदवी मिळविणार्‍या 20,000 अतिरिक्त लोकांना एच -1 बी व्हिसा देखील जारी करू शकतो.

Exit mobile version