रामायणमुळे तरुण पिढीला देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा कळेल – उपराष्ट्रपती
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित झालेल्या रामायणने सर्वाधिक मनोरंजक कार्यक्रम म्हणून जागतिक विक्रम नोंदविल्याबद्दल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आनंद व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये नायडू यांनी ऐंशीच्या दशकातील लोकप्रिय भारतीय महाकाव्यांचे पुनर्प्रसारण केल्याबद्दल दूरदर्शनचे कौतुक केले.यामुळे तरुण पिढीला देशाचा गौरवशाली भूतकाळ आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा कळेल,असं हि त्यांनी नमूद केलं.