Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात कोरोना बाधितांच्या दुपटीचा वेग सुधारला – आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात  आज दिवसभरात कोरोनाचे  ३०३  नवे रुग्ण आढळून आले. कोरोना बाधितांची एकूण संख्या ४२ हजार ८३६ वर पोहोचली असून आतापर्यंत १ हजार ३८९ जणांचा  मृत्यू झाला. ११ हजार ७६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या २९ हजार ६८५ जण उपचार घेत आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी आज नवी दिल्ली इथं  ही माहिती दिली.

देशात कोरोना बाधितांच्या दुपटीचा वेग काही प्रमाणात सुधारला असून, तो ३ पूर्णांक ४ वर आला  आहे. टाळेबंदी आणि काही क्षेत्र प्रतिबंधित  करण्यासारख्या उपायांचा सकारात्मक परिणाम दिसत असून यापुढे  कोरोना संसर्गाच्या दुपटीचा वेग नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान असल्याचं अगरवाल यांनी सांगितलं.

राज्यात काल नवे 678 रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 12 हजार 974 एवढी झाली आहे. आतापर्यंत 548 जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत काल दिवसभरात 21जणांचा मृत्यू झाला तर 441 नवे बाधित रुग्ण आढळले.

Exit mobile version