नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात राज्यात 36 हजार क्विंटलहून अधिक कापसाची खरेदी करण्यात आली आहे. राज्यातल्या ३४ केंद्रांवर हमीभावानुसार कापूस खरेदी सुरु असल्याचं CCI अर्थात भारतीय कापूस महामंडळानं म्हटलं आहे.
भारतीय कापूस महासंघ आणि राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ ऑक्टोबर महिन्यापासून हमीभावानुसार कापूस खरेदी करत आहे.
परभणी जिल्ह्यात पाथरी इथं आज कापूस खरेदी सुरू झाली. कापसाला प्रति क्विंटल ५ हजार ३५५ रूपये भाव मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीनं तालुक्यातल्या नोंदणी केलेल्या ४ हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या कापुस खरेदीचं नियोजन केलं आहे.
धुळे जिल्ह्यात दोंडाईचा इथल्या सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रात आजपासून खरेदी सुरू झाली. याठिकाणी दररोज ४ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्याचे नियोजन आहे.