विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी
Ekach Dheya
नवी दिल्ली : शिवसेनेनं विधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी निश्चित केली आहे. येत्या काही दिवसात ते अर्ज दाखल करतील अशी शक्यता आहे. विधानपरिषदेतल्या ९ रिक्त जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ११ मे ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तर १४ मे ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
शिवसेना आणि महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता दोघांची निवड सहज होण्याची शक्यता आहे. नीलम गोऱ्हे सध्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. तर उद्धव ठाकरे यांना शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आत म्हणजे २८ मे पूर्वी विधीमंडळाचं सदस्य होणं आवश्यक आहे.