पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वास्तव्यास असणा-या परंतु, महाराष्ट्रातील इतर ठिकाणी तसेच परराज्यात जावू इच्छिणा-या नागरिकांसाठी आरोग्यविषयक तपासणी करण्याची सुविधा महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे.
वैद्यकिय तपासणी करिता नागरिकांनी गर्दी न करता, मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचे शिस्तीने पालन करुन रुग्णालयीन प्रशासनास सहकार्य करावे.