आरोग्य सेतु अँपमधे वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित सरकारचे स्पष्टीकरण
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून केंद्र सरकारने सुरु केलेल्या आरोग्य सेतु अँप मधे वापरकर्त्याची माहिती सुरक्षित नसल्याच्या आरोपाचा सरकारने इन्कार केला आहे. या अँप मधे गोळा करण्यात येणाऱ्या माहितीच्या सुरक्षिततेविषयी एका फ्रेंच हॅकरने शंका उपस्थित केली होती. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे स्पष्ट केलं आहे की, वापरकर्त्यांची माहिती हॅक केली जाईल असा कोणताही घटक या अँपमधे आढळलेला नाही.