Site icon साप्ताहिक एकच ध्येय

UNESCO ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ महामारीमुळे सध्या जगभरातल्या शैक्षणिक संस्था बंद असून, त्या जास्त काळ बंद राहिल्या, तर मुलांचं शिक्षण, संरक्षण आणि सर्वांगीण विकासाकरता ते बाधक ठरेल. शैक्षणिक संस्था लवकर सुरु करण्याच्या दृष्टीनं त्या सुरु करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना UNESCO नं जारी केल्या आहेत.

शाळा सुरु करण्यापूर्वी त्या भागातल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेणं आवश्यक असून संबंधित संस्थांनी एकत्रितपणे निर्णय घ्यावा, असं यात म्हटलं आहे. शाळांना  सुरक्षित सामाजिक अंतर, स्वच्छता  आणि अन्य आरोग्यविषयक निकषांची पूर्तता आवश्यक आहे. दूरस्थ शिक्षण आपल्याकडे किती प्रभावी आहे आणि किती जणांना त्याचा लाभ घेता येईल, याचं सर्वेक्षण करून आवश्यक तिथे या माध्यमाचा उपयोग करावा, असं यात म्हटलं आहे.

दरम्यान देशातल्या  शैक्षणिक संस्था सुरु करताना पाळायची   सुरक्षाविषयक नियमावली  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय तयार करत असून , शाळेतली आसन व्यवस्था तसंच  ग्रंथालय , खानावळ, वसतिगृह या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्याबाबतच्या नियमांचा यात समावेश आहे.

Exit mobile version