आषाढी वारीसाठी यंदाही पालखी काढण्याचा समन्वय समितीचा निर्णय, कमी वारकऱ्यांसह सोहळा करण्याचे नियोजन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय सोहळा समन्वयकांनी घेतला आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा प्रस्थान करीत असताना आवश्यक त्या ठिकाणी मार्ग बदलून पंढरपूरला जाईल.
यात अत्यंत कमी वारकऱ्यांचा सहभाग असेल. सातही प्रमुख पालखी सोहळ्याबाबत एक योजना तयार करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. याबाबत एक समन्वय समिती शासनाशी चर्चा करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.