कर्नाटक राज्यातील कामगांरांना मुख्यमंत्र्यांकडून १ हजार ६१० कोटी रुपयांची मदत
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज राज्यातले शेतकरी, बांधकाम मजूर, विणकर, तसंच रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १ हजार ६१० कोटी रुपयांची मदत जाहीर केली. देशातल्या ताळेबंदीमुळे ज्यांचं नुकसान झालं आहे, अशा सर्वांना नुकसान भरपाई मिळेल, असं त्यांनी आज बंगळुरू इथं जाहीर केलं.
राज्यातल्या फुलांच्या बागायतदारांना प्रति हेक्टर २५ हजार रुपये , केशकर्तनालय मालक, बांधकाम मजूर, टॅक्सी-रिक्षा चालकांना प्रत्येकी ५ हजार रुपये मिळणार असून पुढील दोन महिन्यांचं वीज बिल त्यांना माफ असेल. फळं आणि भाजी बागायतदारांना नुकसानभरपाईची रक्कम लवकरच जाहीर असल्याचं येडियुरप्पा यांनी आज सांगितलं.