Site icon साप्ताहिक एकच ध्येय

PMGKP योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 39 कोटी गरजूंना 34,800 कोटी रुपयांची मदत

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या सुविधांचा उपयोग करत, केंद्र सरकारने, प्रधानमंत्री गरीब कल्याण पैकेजअंतर्गत 5 मे 2020 पर्यंत सुमारे 39 कोटी गरजूंना 34,800 कोटी रुपयांची मदत केली आहे. कोविड-19 मुळे लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात, गरिबांना मदत व्हाही या हेतूने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 26 मार्च रोजी या पैकेजची घोषणा केली होती.

PMGK पैकेजचा भाग म्हणून सरकारने महिला, गरीब लोक, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना अन्नधान्य आणि रोख रक्कम देण्याची घोषणा केली. या पैकेजच्या त्वरित अंमलबजावणीकडे केंद्र आणि राज्य सरकारचे सातत्याने लक्ष आहे. वित्त मंत्रालय, इतर संबधित मंत्रालये, कॅबिनेट सचिव आणि पंतप्रधान कार्यालय एकत्रितपणे , या पैकेजचे लाभ गरजू लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

 लाभार्थ्यांपर्यंत रोख मदत त्वरित पोचावी यासाठी फिनटेक आणि डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. थेट लाभ हस्तांतरण सुविधेमुळे, मदतीची पूर्ण रक्कम, कोणत्याही मध्यस्थ अथवा गळतीविना थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे. त्यासाठी लाभार्थ्याना स्वतः बँकेत जाण्याची गरज नाही.

 PMGKP अंतर्गत दिल्या जाणाऱ्या मदतीच्या प्रगतीचा आढावा पुढीलप्रमाणे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज

05/05/2020 पर्यंतचे थेट लाभ हस्तांतरण

योजना

लाभार्थींची संख्या

रक्कम

जन-धन योजना महिला खातेधाराकांना मदत

1st हप्ता – 20.05 कोटी  (98.3%)

दुसरा हप्ता  – 5.57 कोटी

पहिला हप्ता  – 10025 कोटी

दुसरा हप्ता  – 2785 कोटी

NSAP यांना मदत (विधवा, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग)

2.82 कोटी (100%)

1405 कोटी

पीएम-किसाना योजनेअंतर्गत मदत

8.19 कोटी

16394 कोटी

बांधकाम मजुरांना मदत

2.20 कोटी

3493 कोटी

EPFO मध्ये 24%योगदान

.45 कोटी

698 कोटी

एकूण

39.28 कोटी

34800 कोटी

Exit mobile version