Site icon साप्ताहिक एकच ध्येय

फिचर फोन आणि लँडलाइन असलेल्या लोकांसाठी आरोग्य सेतू आयव्हीआरएस सेवेची अंमलबजावणी

नवी दिल्ली : कोविड-19 विरुद्धच्या लढाईत केंद्र सरकारने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या असून राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या सहकार्याने त्यांची देशभर अंमलबजावणी केली जात आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र सरकारने याआधीच आरोग्य सेतू नावाचे  ‍ॲप्लिकेशन सुरु केले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्र्लायाने आरोग्य सेतू मोबाईल ॲप विकसित केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्गाच्या धोक्याचे मुल्यांकन करण्यासाठी हे ॲप लोकांना सक्षम करते. हे अत्याधुनिक ब्लूटूथ तंत्रज्ञान, अल्गोरिदम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरुन इतरांशी त्यांच्या परस्परसंवादाच्या आधारे याची गणना करेल. सर्व नागरिकांनी हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे. एखादी कोरोना बाधित व्यक्ती तिच्या/त्याच्या जवळून गेली तर हे ॲप त्या वापरकर्त्याला याची माहिती देईल, अशाप्रकारे या ॲपचे आरेखन केले आहे.

आरोग्य सेतू ॲप डाउनलोड केल्यानंतर वापरकर्त्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. काही उत्तरांमधून कोविड-19 ची लक्षणे निदर्शनाला आली तर, ही माहिती शासकीय सर्व्हरला पाठविली जाईल. या आकडेवारीनंतर सरकारला वेळेवर पावले उचलण्यास आणि आवश्यक असल्यास अलगाव प्रक्रिया सुरू करण्यास मदत होईल आणि एखादी व्यक्ती कोरोना बाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कात आली असल्यास सतर्कतेचा इशारा देखील दिला जातो. अ‍ॅप गूगल प्ले (अँड्रॉइड फोनसाठी) आणि आयओएस अ‍ॅप स्टोअर (आयफोनसाठी) दोन्ही वर उपलब्ध आहे. हे 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे -10 भारतीय भाषा आणि इंग्रजी.

फीचर फोन व लँडलाईन असणाऱ्या नागरिकांना आरोग्य सेतू संरक्षणा अंतर्गत समाविष्ट करून घेण्यासाठी “आरोगी सेतु इंटरएक्टिव व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम (आयव्हीआरएस)” लागू करण्यात आली आहे. ही सेवा देशभरात उपलब्ध आहे. ही टोल फ्री सेवा असून नागरिकांना 1921 या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्यास सांगितले जाते आणि त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती मागितल्यावर त्यांना परत कॉल केला जाईल.

विचारले जाणारे प्रश्न आरोग्य सेतु ॲप बरोबर संरेखित केले असून दिलेल्या प्रतिसादाच्या आधारे नागरिकांना त्यांच्या आरोग्याची स्थिती दर्शविणारा एसएमएस आणि त्याच्या आरोग्यासाठी अधिक सूचना देखील दिल्या जातील.

मोबाईल अ‍ॅप्लिकेशन प्रमाणेच 11 प्रादेशिक भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. नागरिकाने पुरविलेली माहिती आरोग्य सेतु डेटाबेसचा भाग बनविली जाईल आणि नागरिकांना त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत नागरिकांना माहिती पाठविली जाईल.

कोविड -19 संबंधित तांत्रिक मुद्यांविषयी, मार्गदर्शक तत्त्वे आणि सल्ले-सूचनांविषयी सर्व प्रमाणित आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया https://www.mohfw.gov.in/.येथे नियमितपणे भेट द्या.

कोविड-19 संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19@gov.in वर आणि इतर प्रश्न ncov2019@gov.in वर आणि @CovidIndiaSeva येथे ट्विट करून विचारले जाऊ शकतात.

कोविड -19 संबधित काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी  + 91-11-23978046 किंवा 1075 (टोल फ्री) वर संपर्क साधा. कोविड-19 संबधित राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील उपलब्ध आहे.

https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf

Exit mobile version