Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रवासासाठी डॉक्टरांचा प्रमाणपत्राची गरज नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित व्यक्तींना प्रवासासाठी डॉक्टरांचं प्रमाणपत्र आता द्यावं लागणार नाही. राज्य सरकारने याबाबतचे आदेश काढले आहेत. प्रवास सुरू करण्यापूर्वी या व्यक्तींच्या शरीराचे तपमान मोजले जाईल आणि कोरोनाच्या लक्षणांची चाचणी केली जाईल.

ही चाचणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून महापालिकेद्वारे मोफत केली जाणार आहे. यामध्ये सर्दी, ताप, खोकला, श्वास अडकणे यासारखी लक्षणं नसलेल्या व्यक्तींना प्रवासाची परवानगी दिली जाईल. त्यामुळं स्थलांतरित व्यक्तींना डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणण्याची गरज नाही.

Exit mobile version