Site icon साप्ताहिक एकच ध्येय

डीएनए तंत्रज्ञान (उपयोग आणि वापर) नियमन विधेयक-2019 लोकसभेत सादर

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत डीएनए तंत्रज्ञान (उपयोग आणि वापर) नियमन विधेयक-2019 सादर केले. बेपत्ता व्यक्ती, अज्ञात मृत व्यक्ती, खटले सुरु असलेले आरोपी, आदींची ओळख पटवण्याच्या उद्देशाने डीएनए तंत्रज्ञानाच्या उपयोग आणि वापराच्या नियमनासाठी हे विधेयक आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी हे विधेयक मांडतांना सांगितले.

देशातल्या न्याय व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी डीएनए आधारित न्यायवैद्यक तंत्रज्ञानाचा वापर विस्तारणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक डीएनए डेटा बँकांच्या स्थापनेमुळे न्यायवैद्यक तपासाला मदत होईल.

Exit mobile version