Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशभरात संचारबंदी असतानाही गहू तसंच तांदळ्याच्या दुसऱ्या पिकाच्या खरेदीची प्रक्रिया सुरळीत सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावासाठी देशभरात संचारबंदी असतानाही, गहू तसंच तांदळ्याच्या दुसऱ्या पिकाच्या खरेदीची प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. यावर्षी ४०० लाख मेट्रिक टन गहु खरेदीचं लक्ष्य सरकारनं ठरवलं होतं.

त्यापैकी ६ मेपर्यंत २१६ लाख मेट्रिक टन गव्हाची केली असल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. देशात सर्वाधिक म्हणजे १०४ लाख मेट्रिक टनांहून अधिक खरेदी पंजाबामध्ये झाली आहे.

तर सरकारी संस्थांनी आत्तापर्यंत ४४ लाख मेट्रिक टनांहून अधिक तांदळाची खरेदी केली आहे. यापैकी सर्वाधिक ३० लाख टन खरेदी तेलंगणात झाली आहे.

Exit mobile version