नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत अर्थव्यवस्थेला तत्काळ गती देणं आवश्यक असून, या कामी जेवढा उशीर होईल, तेवढी परिस्थिती आणखी खालावत जाण्याची भीती काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी वर्तवली आहे.
ते आज सामाजिक संपर्क माध्यमावरून वार्ताहर परिषदेत बोलत होते. रोजगार निर्मात्यांना आर्थिक बळ देण्याची गरज व्यक्त त्यांनी व्यक्त केली. रोजगार आणि रोजंदारीच्या शाश्वतीसाठी आर्थिक मदतीची एक फळी उभारण्याची आवश्यकताही त्यांनी नमूद केली.
ही लढाई जिंकण्यासाठी अधिकारांचं विकेंद्रीकरण व्हायला हवं, असंही गांधी यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.