Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पर्यटन मंत्रालयाने “देखो अपना देश” मालिकेअंतर्गत ‘गोवा-क्रूसिबल ऑफ कल्चर’ या नावाने आयोजित केले 16 वे वेबिनार

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने “देखो अपना देश” या वेबिनार मालिकेअंतर्गत 7 मे 2020 रोजी आयोजित केलेल्या ‘गोवा-क्रूसिबल ऑफ कल्चर’ या शीर्षकाखाली भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यामधील कमी ज्ञात किंवा अज्ञात प्रवासी अनुभवांचे सादरीकरण केले. याद्वारे सहभागी लोकांना गोव्यातील अज्ञात सौंदर्य स्थळांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.

लेखक, छायाचित्रकार आणि वेबिनार महोत्सवाचे प्रमुख विवेक मेनेझिस यांनी सादर केलेले वेबिनार म्हणजे गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे आणि नाईटलाइफच्या पलीकडील शतकानुशतकांच्या विस्मयकारक सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सर्जनशीलता असलेल्या गोव्यातील समृद्धीचे दर्शन घडविते.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, गोवा कला आणि साहित्य महोत्सव, सेरेन्डीपीटी कला महोत्सव, स्थानिक उत्सव, संगीत, खाद्य, वास्तूकला आणि चित्रकला यांचे सादरीकरण या वेबिनारमध्ये करण्यात आले.

आजचा प्रवास हा पर्यटन स्थळे पाहण्यापुरता मर्यादित नाही; हा सर्व नवीन अनुभवांबद्दल आहे आणि प्रत्येक ठिकाणच्या लोकांना आणि त्यांच्या संस्कृती जाणून घेण्याविषयीचा आहे. स्थानिक निवासात राहणे, स्थानिक कला शिकणे, जेवण बनविणे, एखाद्या समुदायात स्वयंसेवक म्हणून काम करणे अशा काही क्रिया आठवणीत राहतील.

अतिरिक्त महासंचालक रूपिंदर ब्रार यांनी वेबिनारचा समारोप करताना शाश्वत प्रवासावर जोर दिला. समुदायावरील नकारात्मक प्रभाव कमी करून पर्यटन आणि पर्यटक यातील सकारात्मकतेला चालना देण्याचे ‘सामाजिक-सांस्कृतिक शाश्वततेचे’ उद्दीष्ट आहे असे त्यांनी सांगितले.

वेबिनारचे सत्र आता https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured या लिंकवर आणि पर्यटन मंत्रालयाच्या incredibleindia.org आणि tourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

‘एक्सप्लोरिंग रिव्हर निला’ शीर्षकाखाली पुढील वेबिनर 9 मे 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता नियोजित आहे. नोंदणी करण्यासाठी https://bit.ly/RiverNila येथे भेट द्या

Exit mobile version