Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातला कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातला कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. या तुरुंगातील किमान ७७ बंदी आणि २६ कर्मचाऱ्यांना याची लागण झाल्याचं या आठवड्याच्या प्रारंभी स्पष्ट झालं होतं.

त्या पार्श्वभूमीवर एका कैद्यानं वैद्यकीय कारणासाठी तात्पुरता जामीन मिळावा, अशी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी ती फेटाळली, मात्र इतर कैद्यांना याची लागण होऊ शकतं हे लक्षात घेऊन राज्य सरकार आणि तुरुंग प्रशासनानं यावर निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले.

दरम्यान भाजीपाला आणि इतर वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यामुळे आर्थर रोड तुरुंगात कोरोनाचा शिरकाव  झाला असल्याची शक्यता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्तवली आहे.

Exit mobile version