Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडतानाच्या धोरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सुधारित दिशानिर्देश जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मधून बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडतानाच्या धोरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल सुधारित दिशानिर्देश जारी केले. त्यानुसार आता नोवेल कोरोना विषाणू संसर्गाची तीव्र लक्षणं आढळलेल्या आणि रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम झालेल्या रुग्णांचा RT-PCR चाचणीचा अहवाल नकारात्मक मिळाला तरच त्यांना रुग्णालयातून सुटी देता येईल. ज्यांच्यात लक्षणं नसतील किंवा सौम्य, अति सौम्य असतील त्यांची लक्षणं दिसेनाशी झाल्यावर RT-PCR चाचणी न करताही त्यांना रजा देता येईल.

कोविड १९ च्या रुग्णांचं आजाराच्या स्तरानुसार वर्गीकरण करुन वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील. आतापर्यंत संसर्ग उघड झाल्यानंतर प्रथम १४ दिवसांनी आणि नंतर २४ दिवसांनी, चाचणी नकारात्मक आली तरच रुग्णाला डिस्चार्ज मिळत होता. सुधारित दिशानिर्देशांनुसार सौम्य लक्षणं दाखवणाऱ्या रुग्णांना ३ दिवसात ताप उतरला आणि ९५  % श्वासोच्छ्वास नियमित राहिला तर १० दिवसात घरी सोडलं जाईल. त्यासाठी वेगळ्या चाचणीची गरज नाही.

या रुग्णांना नंतर ७ दिवस घरीच विलग रहावं लागेल, तसंच दर १४ दिवसांनी दूरध्वनीवरुन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली जाईल. त्यांना पुन्हा ताप किंवा इतर लक्षणं दिसली तर १०७५ या क्रमांकावर संपर्क साधावा असं आरोग्य मंत्रालयाच्या परिपत्रकात म्हटलं आहे. HIV रुग्ण, अवयव प्रत्यारोपण झालेले आणि कर्करुग्ण असलेल्या कोरोनाबाधितांना कोविड १९ मधून बरं वाटू लागल्यावर एकदा RT-PCR चाचणी अहवाल नकारात्मक आला तर रुग्णालयातून सुटी मिळेल.

Exit mobile version