Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची अंतिम सत्राची परीक्षा रद्द करावी – युवा सेना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची अंतिम सत्राची परीक्षा रद्द करावी, अशी मागणी युवा सेनेनं विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगानं प्रथम आणि द्वितीय वर्ष परीक्षेबाबत नियमावली बनवली आहे. मात्र अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून त्याचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे.

युवासेना प्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार, ही परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचं युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं महाविद्यालयं आणि विद्यापीठांच्या परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं स्वागत केलं आहे. सरकारनं सद्यस्थिती आणि विद्यार्थ्यांची अपरिहार्यता लक्षात घेतल्याचं यासंदर्भात अभाविपचे महाराष्ट्र प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान विद्यापीठांनी याआधीच्या सत्रांच्या पुनर्मूल्यांकनाचे निकाल घोषित केलेले नाहीत, ते लवकरात लवकर घोषित करावेत, तसंच पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही अभाविपनं केली आहे.

Exit mobile version