Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये120 ई-बस दाखल

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागणीनुसार 120 ई-बस उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याकरिता पुणे महापालिकेचा 60 टक्के तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 40 टक्के हिस्सा यानुसार या बसची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पुण्याच्या वाट्याला 70 तर, पिंपरीच्या वाट्याला 50 बस आल्या आहेत.

तीन तासांच्या चार्जिंगनंतर ही बस 150 ते 200 किलोमीटर अंतर पार करु शकते. या सर्व बस वातानुकुलीत असून, नेहमीच्या मार्गांवर धावणा-या बस तिकीटाच्या दरातच या बसमधून प्रवास करता येणार आहे. यापुर्वीच निगडी-भोसरी मार्गावर या बस धावत असून, त्यांना प्रवाशांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या बस 12 मीटर लांबीच्या असून, भक्‍ती-शक्‍ती बस टर्मिनलमध्ये चार्जिंगकरिता पाच पॉईंट उपलब्ध आहेत. त्यामुळे दिवसभरात एकूण 40 बस चार्जिंग करता येणार आहेत. हे चार्जिंग पॉईंट कमी पडत असल्याने, याचठिकाणी आणखी नवीन चार्जिंग पॉईंट निर्माण केले जाणार आहेत. त्याकरिता महावितरणकडून इस्टिमेट मागविण्यात आले आहे. याशिवाय पीएमपीएमएलच्या भेकराईनगरमध्येदेखील चार्जिंग पॉईंट उपलब्ध आहेत.

Exit mobile version