Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मध्य प्रदेशातील मजूर रवाना- जिल्हाधिकारी राम

पुणे : दौंड व पुरंदर तालुक्यात लॉकडाऊन मुळे अडकलेल्या मध्यप्रदेशमधील 1172 मजुरांना विशेष श्रमिक रेल्वे द्वारे दौंड रेल्वे स्टेशन येथून आज सायंकाळी 5 वाजता रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

आज एकूण 1172 मजूर व त्यांचे कुटुंब यांना मध्यप्रदेशातील 33 जिल्ह्यांमध्ये पाठवण्याची सोय करण्यात आली. या मजुरांना पाठवताना त्यांचे थर्मल स्क्रीनिंग करून प्राथमिक तपासणी व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून शिस्तबद्धरित्या पाठवण्यात आले.

सर्व मजुरांना पाठवण्याचे नियोजन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार व प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार संजय पाटील व सर्व महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन व नगरपालिका यांच्या साहाय्याने पार पडले.

Exit mobile version