Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात २५ हजार उद्योग सुरू, सुमारे ६ लाख कामगार परतले कामावर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू झालं असून सहा लाख कामगार रुजू झाले असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर, पुणेच्यावतीने आयोजित बेवनारमध्ये ते बोलत होते. कोविड१९ ची महामारी आणि लॉकडाउनमधे ठप्प झालेलं उद्योग क्षेत्र पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीनं शासनाने रेड झोन वगळता राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना परवाने दिले आहेत.

मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड हा भाग रेड झोनमध्ये आहे. तिथले उद्योग सुरू करण्याची मागणी होत आहे. महिना अखेरपर्यंत पूर्ण राज्य ग्रीन झोन करण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं.

स्थिर वीज बिलाबाबत उर्जामंत्र्यांसोबत चर्चा केली असून जेवढा विजेचा वापर होईल, तेवढेच बिल आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version