Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशातली रेल्वे वाहतूक उद्यापासून अंशतः सुरू होणार, आज ४ वाजेपासून ऑनलाइन करता येणार तिकीट आरक्षण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली रेल्वे सेवा उद्यापासून अंशतः सुरू होणार आहे. सुरूवातीला केवळ १५ वातानुकूलित रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत. दिल्लीहून – मुंबई, दिब्रुगड, आगरताळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलुरू, चेन्नई, तिरूवनंतपूरम्, मडगाव, अहमदाबाद, आणि जम्मू तावी या शहरांपर्यंत च्या गाड्यांचा त्यात समावेश आहे.

या गाड्यांसाठी आज संध्याकाळी ४ वाजता केवळ ऑनलाईन तिकिट विक्री सुरू होईल. कोणत्याही रेल्वे स्थानकावर तिकिट विक्री उपलब्ध असणार नाही. वैध तिकिट असणाऱ्या प्रवाशांनांचं फक्त रेल्वेत प्रवेश दिला जाईल. प्रवाशांना तोंडाला मास्क लावणं बंधनकारक असून आवश्यक तपासणी केल्यानंतरच त्यांना प्रवासाची परवानगी दिली जाईल.

रेल्वेच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात IRCTC चे समभाग 5 टक्क्यांनी वधारले.

Exit mobile version