केपजेमिनी व कमिन्स इंडिया कंपनीच्या वतीने सॅनिटायझर व पीपीई किट जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द
Ekach Dheya
पुणे : केपजेमिनी लिमिटेड या कंपनीच्या वतीने आतापर्यंत एकूण 3 हजार 500 पीपीई किट, 1 हजार 500 फेस शिल्ड, 50 इन्फ्रारेड थर्मामीटर आणि एक हजार सॅनिटायझर च्या बॉटल मदत स्वरुपात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी कमिन्स इंडिया फौंडेशन, बालेवाडी या कंपनीच्या वतीने 300 पीपीई किट, एक हजार एन 95 मास्क, 5 हजार ट्रिपल लेअर मास्क जिल्हाधिकारी श्री. राम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे तसेच केपजेमीनी कंपनीचे मनीष मेहता, विनय शेट्टी, कमिन्स कंपनीच्या सपना खरबस उपस्थित होत्या. सीएसआर निधीतून जिल्हा प्रशासनाला वैद्यकीय साधनांची मदत केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री राम यांनी कंपनीचे आभार मानले.