गृह मंत्रालयानं प्रवाशांच्या वाहतुकीबाबतची प्रक्रिया आणि नियम केले जारी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली प्रवासी रेल्वे सेवा उद्यापासून सुरु होत असून, केंद्रीय गृह मंत्रालयानं प्रवाशांच्या वाहतुकीबाबतची प्रक्रिया आणि नियम जारी केले आहेत. यानुसार कोरोनाची कुठलीही लक्षणं नाहीत, अशा नागरिकांनाच या गाड्यांमधून प्रवासाची परवानगी मिळणार असल्याचं केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.
रेल्वे स्थानकात प्रवेश करताना तसंच प्रवासादरम्यान सुरक्षित सामाजिक अंतर तसंच प्रवाशांचं कोरोना- स्क्रिनिंग या गोष्टींची दक्षता रेल्वे मंत्रालयानं घ्यावी असं त्यांनी म्हटलं आहे. प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवास करताना, तसंच प्रवासा दरम्यान हॅन्ड सॅनिटायझर दिला जाईल, तसंच निर्धारित स्थानकावर पोहोचल्यावर संबंधित प्रशासनानं जारी केलेल्या नियमांचं पालन करणं प्रवांशांसाठी बंधनकारक असल्याचं या आदेशात म्हटलं आहे.