नवी दिल्ली : किसान सुविधा मोबाईल ॲप सुरु झाल्यापासून आतापर्यंत 10 लाख 63 हजार 80 डाऊनलोड्स झाले आहेत, तर पुसा कृषी मोबाईल ॲपचे 40 हजार 753 डाऊनलोड्स झाले आहेत.
किसान सुविधा मोबाईल ॲपवर खालील सेवा आणि माहिती उपलब्ध आहे:
- हवामान अंदाज
- खराब हवामानाचा इशारा
- वस्तूंचे बाजारभाव
- विक्रेता-खते, बियाणे, किटकनाशके, इत्यादी
- 12 प्रमुख पिकांसाठी संरक्षण
- कृषी सल्लागार
- मृदा आरोग्य कार्ड
- मृदा परीक्षण प्रयोगशाळा
- शीतगृह आणि गोदामे
- पशुवैद्यकीय प्रयोगशाळा आणि निदान केंद्रे
- पिक विमा
- सरकारी योजना
पुसा कृषी मोबाईल ॲपवरुन अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली जाते. या ॲपवर 185 तंत्रज्ञानांची माहिती उपलब्ध आहे. हे मोबाईल ॲप हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमधे उपलब्ध आहे, तर किसान सुविधा मोबाईल ॲप इंग्रजी, हिंदी, तामिळ, गुजराती, ओरीया, पंजाबी, मराठी, बांगला आणि तेलगू या 9 भाषांमधे उपलब्ध आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी लोकसभेत ही माहिती दिली.