Site icon साप्ताहिक एकच ध्येय

परराज्यातील मजुरांना सीमेपर्यंत पोहोचवा-उच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन मधे रोजगार गमावल्यानं आपापल्या गावी चालत निघालेल्या स्थलांतरित कामगारांना महामार्गांवर शोधून काढून राज्याच्या सीमेपर्यंत पोचवण्यासाठी विशेष पथकं तयार करावीत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं  राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त  आणि जिल्हा पातळीवरच्या इतर अधिकाऱ्यांना दिले आहेत.

स्थलांतरित कामगारांच्या दशेची स्वतःहून दखल घेऊन केलेल्या सुनावणी दरम्यान नागपूर पीठाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी काल हे निर्देश दिले. या कामासाठी नेमलेल्या पथकांनी महामार्गांवरुन चालत निघालेल्या कामगारांची माहिती जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षकांना द्यावी.

त्या अधिकाऱ्यांनी या कामगारांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याकरता आवश्यकतेनुसार बसगाड्या पुरवण्याची विनंती राज्य परिवहन महामंडळाकडे करावी, असं न्यायालयानं सांगितलं आहे. पुढची सुनावणी येत्या गुरुवारी होणार आहे.

Exit mobile version