नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसंच सीमा सुरक्षा दलासाठी चालवण्यात येणाऱ्या कॅन्टीन मधून येत्या १ जूनपासून फक्त स्वदेशी वस्तू विकल्या जाणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
प्रधानमंत्र्यांनी आत्मनिर्भरतेचा संदेश दिल्यावर मंत्रालयानं हा निर्णय घेतल्याचं शहा यांनी ट्विटरवरून सांगितलं. जनतेनं स्वदेशी वस्तूंचीच खरेदी करावी असा आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
प्रत्येक भारतीयान स्वदेशी वस्तू वापरण्याची प्रतिज्ञा केली तर येथल्या पाच वर्षात देश आत्मनिर्भर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.