नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिफाची सतरा वर्षाखालच्या महिलांसाठीची विश्वचषक स्पर्धा आता पुढच्या वर्षी १७ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान होणार आहे. ही स्पर्धा याच वर्षी २ ते २१ नोव्हेंबर दरम्यान होणार होती.
मात्र कोरोना विषाणू संसर्गामुळं ही स्पर्धा पुढं ढकलण्यात आली आहे. नवी मुंबई, कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर आणि अहमदाबाद या ठिकाणी हे सामने होणार आहेत.