Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात आतापर्यंत १ हजार १ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू संसर्ग

मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात नवे २२ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. आज सापडलेल्यांमध्ये रत्नागिरीतले सात, मंडणगडमधले ११, तर दापोली तालुक्यातल्या चार जणांचा समावेश आहे. हे सर्व जण मुंबईतून आलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे तीन बळी गेले असून, पाच रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पालघर जिल्ह्यात काल कोविड १९ चा संसर्ग झालेले ३ नवे रुग्ण आढळून आले. पालघर इथल्या कोविड विषाणूची लागण झालेल्या एका परिचारिकेचा पती आणि मुलगी तसंच, डहाणूमधल्या एका व्यक्तीला कोविड विषाणूचा संसर्ग झाला आहे. डहाणू इथल्या रुग्णाचा  मुंबईतल्या  के ई एम रुग्णालयात कोविड विषाणू बाधित अन्य रुग्णांबरोबर संपर्क आला होता.

पनवेल तालुक्यातल्या उलवे इथं एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे उलवे इथली उन्नती ही रहिवासी इमारत प्रशासनानं सील केली आहे.

लातूर जिल्ह्यात काल कोरोनोमुळे उदगीर इथल्या एका महिलेचा मृत्यु झाला आहे. उदगीर इथल्या कोरोना विषाणु बाधीताची संख्या २९ झाली आहे.

जालना जिल्ह्यात आणखी दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली.  जालना इथल्या राज्य राखीव दलाच्या एका जवानासह परतूर दिल्या एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून जालना जिल्ह्यातल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे.

अमरावती जिल्ह्यात आणखीन पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८९ वर पोचली आहे. अमरावतीत आरोग्य सेवक आणि पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता आतापर्यंत १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५६ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत तर २१ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सांगली जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे. सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा ४३ झाला आहे. तासगाव आणि गव्हाण इथले हे रुग्ण आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यात तीस वर्षीय महिला व अकरा वर्षाचा मुलगा आणि पाच वर्षाच्या मुलीचा  समावेश आहे. तिघांनीही मुंबईहून कोल्हापुरला प्रवास केला होता.

औरंगाबाद इथं ५५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे औरंगाबाद शहरात कोवीड-१९ मुळे मरण पावलेल्यांची संख्या २० झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २१० रूग्ण कोरोनाविषाणू मुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, औरंगाबाद जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता ७४३ वर पोहोचली आहे.

राज्यात आतापर्यंत १ हजार १ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे. कोविड-१९ ने ८ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर ८५१ पोलिसांवर उपचार सुरु आहेत. १४२ जण बरे झाले आहेत.

Exit mobile version