Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आगामी काळात सौंदर्य आणि आरोग्य उद्यमशिलता क्षेत्रात 70 लाख युवकांसाठी भारत रोजगार निर्मिती करणार- डॉ. पांड्ये

नवी दिल्ली : आगामी काळात भारताला 70 लाखांहून अधिक कुशल मनुष्यबळाची गरज भासेल, असे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशिलता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांड्ये यांनी म्हटले आहे. भारताच्या लोकसंख्येत 62 टक्क्यांहून अधिक तरुण असून, भारताला जगातला सर्वात मोठी कुशल अर्थ व्यवस्था बनवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न असल्याचे ते म्हणाले. ते नवी दिल्लीत एका संस्थेच्या वार्षिक पदवीदान समारंभात ते बोलत होते.

देशातील सौंदर्य आणि आरोग्य उद्योगात लाखो लोकांना रोजगाराच्या संधी पुरवण्याची क्षमता असल्याचे ते म्हणाले. महिला सक्षमीकरणासाठी हे अभ्यासक्रम महत्वाचे साधन आहे. या प्रशिक्षणानंतर मुद्रा योजने अंतर्गत कर्ज घेऊन ते स्वत:ची सौंदर्य आणि आरोग्य केंद्रे उभारु शकतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यावेळी त्यांनी कुशल भारत अभियान, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, आदी योजनांची माहिती दिली.

Exit mobile version