नवी दिल्ली : भारताच्या कोविड१९ सामाजिक सुरक्षा प्रतिसाद कार्यक्रमासाठी जागतिक बँकेनं आज एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचं कर्ज मंजूर केलं. कोविड१९ च्या महामारीतून सावरताना गरीब आणि दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी हा निधी वापरायचा आहे.
यातले ५५ कोटी डॉलर्स जागतिक विकास संघटनेकडून मिळणार असून आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँकेकडून २० कोटी डॉलर्स साडे अठरा वर्षांसाठी कर्जाऊ मिळणार आहेत. उर्वरित निधी येत्या ३० जूननंतर मिळणार असल्याचं जागतिक बँकेचे भारतातले संचालक जुनैद अहमद यांनी प्रसारमाध्यमांना एका वेबिनार मधे सांगितलं.