लॉकडाऊनमुळे वाढलेल्या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी साखर उद्योगाला विशेष पॅकेज द्यावं- शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ ची महामारी आणि प्रतिबंधासाठी लावलेल्या लॉकडाऊनमुळे साखर उद्योगाच्या अडचणीत वाढ झाली असून त्यातून बाहेर पडण्यासाठी केंद्रसरकारने विशेष पॅकेज द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी केंद्र सरकारने किमान हमी भाव, साखर निर्यात, जादा साठा तसंच एथेनॉल उत्पादनावरच्या शुल्कात सूट अशा बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेतले होते.असं त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.
आताही या उद्योगाला सावरण्यासाठी तातडीनं पावलं उचलावी अशी मागणी केल्याचं पवार यांनी समाजमाध्यमांवर जाहीर केलं आहे.राज्य सहकारी साखर कारखाना महासंघानं आता किमान हमीभावात वाढ,निर्यातीला चालना, साखर कारखान्यांच्या डिस्टीलरीजना धोरणात्मक औद्योगिक एककाचा दर्जा इत्यादी मागण्या केल्या आहेत.