खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची महापालिकेच्या कोरोना-१९ वॉर रुम’ ला भेट
Ekach Dheya
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात ‘कोविड १९ वॉर रुम’ला आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने महानगरपालिका करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबविलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसदस्या पंकज भालेकर, नगरसदस्या सीमा सावळे, सुलक्षणा धर, आशा शेंडगे, अनुराधा गोफणे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसदस्य प्रभाकर वाघेरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोडदे, संदीप खोत, स्मिता झगडे, लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे आदी उपस्थित होते.
डॉ. अमोल कोल्हे यांनी कोरोना बाबत नगरसदस्यांच्या समस्यांबाबत अडचणी विचारणा केली. त्यावर आयुक्त हर्डीकर यांनी कोरोनाची सुरुवात झाल्यापासून ते आत्तापर्यंत केलेली कार्यवाही आलेल्या अडचणी त्यावर मार्ग काढून केलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. कोरोना वॉर रुममध्ये रुग्णांची अद्यावत माहिती उपलब्ध असून ती शहरातील सर्व
नगरसदस्य/ सदस्यांना रोजच्या रोज उपलब्ध करून देण्यात येत असून त्यामध्ये बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मयत रुग्ण संख्या, कंटेनमेंट झोन माहिती व नकाशा आदींबाबत माहितीचा समावेश असतो तसेच महानगरपालिका व सामाजिक संस्थांमार्फत शहरातील १ लाख २६ हजार गरजू व्यक्तींना दररोज जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त हर्डीकर यांनी दिली.