खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांमुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला बाधा पोचत नाही
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांमुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला कोणतीही बाधा पोचत नाही, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.
खोट्या बातम्यांचे परिणाम घातक असतात, आणि अशा बातम्यांविरुद्धच्या लढ्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी यासंदर्भात लिहीलेल्या एका लेखात म्हटलं आहे. भारतात केवळ आणिबाणीच्या काळातच पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला बाधा पोचली असल्याचंही त्यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.