Site icon साप्ताहिक एकच ध्येय

औरंगाबाद मध्ये एक लाख छपन्न हजारांचे तंबाखूजन्यपदार्थ जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद इथं गुटखा, पानमसाला तसंच सुगंधी तंबाखू विकणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सुमारे एक लाख छपन्न हजाराचा प्रतिबंधित गुटखा तसंच सुगंधी तंबाखू जप्त केली आहे. अन्न औषध प्रशासन आणि पोलिस विभागानं संयुक्तपणे ही कारवाई केली.

दरम्यान, औरंगाबाद शहरात संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन विक्रेत्यांविरोधातही कारवाई केल्याचं, पोलिस विभागानं जारी केलेल्या पत्रात सांगितलं आहे.

Exit mobile version