नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या साथीमुळं अनेक ठिकाणी बाजार समित्यांमध्ये नेहमीप्रमाणे होणारे व्यवहार बंद आहेत. यावर मात करण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सांगली बाजार समितीनं बेदाण्यांचे ऑनलाइन व्यवहार सुरू केले आहेत.
त्यात पहिल्या दिवशी १२५ लॉट्सचे नमुने पाहणीसाठी ठेवले होते. खरेदीदारांनी तासाभरात ऑनलाईन बोली लावली. यात ९४० किलो बेदाण्यांची विक्री झाली. सर्वाधिक १८५ रुपये किलोचा दर मिळाला. तर सरासरी दर १४० ते १६५ रुपये किलो होता. आता तासगाव बाजारसमितीमध्येही अशाच प्रकारे बेदाण्याचे ऑनलाइन सौदे सुरू केले जाणार आहेत.