नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०१९-२०२० मध्ये भारताचं अन्नधान्य उत्पादन २९ कोटी ५६ लाख ७० हजार टन झालं आहे. देशात अशा प्रकारे विक्रमी अन्नधान्य उत्पादन होण्याचं हे सलग चौथं वर्ष आहे.
हे उत्पादन आधीच्या वर्षापेक्षा १ कोटी ४ लाख ६० हजार टन इतकं अधिक आहे. उत्तम पर्जन्यमानामुळे तांदूळ, गहू, तेलबिया, तृण धान्य आणि कापूस या पिकांचं उत्पादन चांगलं अपेक्षित आहे.
वर्ष २०१८-२०१९ मध्ये अन्नधान्य उत्पादन २८ कोटी ५२ लाख १० हजार टन झालं होतं. कृषि मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.