Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारतीय नागरिकांना घेऊन आयएनएस जलाश्व मालेतून रवाना

समुद्र सेतू अभियानाचा दुसरा टप्पा

नवी दिल्ली : भारतीय नागरिकांना समुद्रमार्गे परदेशातून परत आणण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नात भारतीय नौदलाच्या समुद्र सेतू अभियानाचे योगदान म्हणून भारतीय नौदलाच्या जलाश्व जहाजावर माले येथील बंदरात 15 मे 20, रोजी 588 भारतीय नागरिकांना चढविण्यात आले. या 588 प्रवाशांमध्ये सहा गर्भवती माता आणि 21 मुलांचा समावेश आहे.

माले येथे जोरदार पाऊस आणि ताशी 30 ते 40 नॉट्स वेगाने वाहणारे वारे या वातावरणात जहाजाच्या कर्मचार्‍यांनी सुरक्षितता आणि वैद्यकीय नियमांचे प्रत्येक वेळी पालन करीत प्रवाशांसाठी असलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्याची खात्री दिली. प्रवास सुरु करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या नियोजित गंतव्य प्रक्रियेस खराब वातावरणामुळे अडथळा निर्माण झाला.

आज सकाळी माले येथून कोचीसाठी हे जहाज सोडण्यात आले.

Exit mobile version