Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पावसाळ्यात साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहणं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृतीदलाचे अध्यक्ष संजय ओक यांनी पीटीआयला सांगितलं की मलेरिया, डेंगू, कावीळ, अतिसार अशा आजारांचा धोका पावसाळ्यात जास्त आहे. त्याचा परिणाम होऊन कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती आणखी बिघडू शकते.

त्यादृष्टीने कोविड-१९ रुग्णालयांमधली व्यवस्था येत्या ऑगस्टपर्यंत कायम ठेवावी असं कृतीदलानं सरकारला सुचवलं आहे. सध्या राज्यात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ११ दिवस आहे तो २० पर्यंत जायला हवा असं ते म्हणाले.

Exit mobile version