नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे मालदिवमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या ऑपरेशन समुद्रसेतू अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. नौदलाचं आय एन एस जलाश्व हे जहाज मालदिवमध्ये अडकलेल्या ५८८ भारतीयांना घेऊन आज मायदेशी निघालं.
यात २१ बालकं आणि सहा गर्भवती महिलांचा समावेश आहे. माले बंदरात संपूर्ण तपासणीनंतर या प्रवासाला सुरूवात झाली. पाऊस आणि वादळी वाऱ्यातही नौदलाच्या जवानांनी सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
आय एन एस जलाश्व मालेवरून सकाळीच कोचीकडे रवाना झाल्याची माहिती पश्चिम विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.