नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळं मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना बेस्ट उपक्रमात सामावून घेतलं जाणार असल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या संकटातही बेस्टची बस सेवा सुरू आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या चार बेस्ट कर्मचाऱ्यांचा कुटुंबियांना आतापर्यंत उपक्रमाच्या सेवेत नियुक्तीचे आदेश दिले असून उर्वरित मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना लवकरच सेवेत दाखल करून घेतलं जाईल असं त्यांनी सांगितलं.
बेस्ट उपक्रमानं याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे.